विशाल दादा...
भाजपाला विरोधाला विरोध म्हणूनच तुम्हाला सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदारानी निवडून दिल आहे.
स्मार्ट मीटर बाबत आपण आपले मत मांडताना कोणते निष्कर्ष तपासले आहेत हे जरा जाहीर कराव
कारण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ह्याच सभागृहात तात्कालीन उपमुख्यमंत्री तथा आत्ताचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी प्रीपेड मीटर म्हणजेच स्मार्ट मीटर बसवणार नाही असे जाहीर केले होते.
सदर मीटरची मूळ किंमत किती आहे त्याला केंद्र सरकारने किती सबसिडी दिली आहे राज्य सरकार किती रुपयाला खरेदी करत आहे याचा अभ्यास केला आहे का..?
प्रीपेड मीटर आणि आता बसवत असलेले स्मार्ट मीटर दोन्ही एकच आहेत का वेगवेगळे आहेत याचा अभ्यास केला आहे का...?
देशातील उत्तर प्रदेश बिहार राजस्थान या राज्यात स्मार्ट मीटरचा दुसरा भाऊ म्हणजे प्रीपेड मीटर बसवले आहे तिथे जनतेचा उद्रेक आपण पाहिला आहे का आपण आता संसदेच्या अधिवेशनासाठी गेलेले आहात ज्या ज्या राज्यात अशा पद्धतीने मीटर बसवलेले आहेत त्या राज्यातील आपल्या सहकारी खासदारांना याबाबत माहिती विचारावा
तसेच आपल्या मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्ह्यातील ग्रामीण भाग असेल लोक स्मार्ट मीटरच्या वाढीव बिलाबाबत टाचा घासत आहेत मग ते चुकीचे आहेत का याबाबत आपले मत व्यक्त करा.
सरकारच्या सरसकट कोणत्याही योजना चांगल्या नसतात किंवा वाईट ही नसतात अपवादात्मक मग आपण विरोधी पक्षात असल्यामुळे त्याला विरोध करता मग तो कोणता विरोध असतो असं समजायचं याबाबत सुद्धा आपण खुलासा करावा अशी विनंती आहे.
विकास कामांना चांगल्या धोरणात्मक कामांना कोणाचाही विरोध नसतो लोक आपापली संमती देत असतात मात्र स्मार्ट मीटरचे समर्थन करणे हे 100 % चुकीचे आहे याबाबत आपण पुनश्च एकदा विचार करून मत व्यक्त करावे....
सतीश साखळकर,उमेश देशमुख