जनसंकल्पनेतून साकारणार राज्याच्या पाणी व स्वच्छता मिशनचा बोधचिन्ह

  • लक्ष्मण फुंडे (पवनी)
  • Upadted: 15/09/2020 6:26 PM

📌 राज्य पाणी व स्वच्छता मिशन करिता राज्यस्तरीय बोधचिन्ह स्पर्धा

📌 50 हजार रूपये रोख रक्कमेचा पुरस्कार

📌 व्यक्ती, संस्था, जाहिरात संस्थाही होवू शकतील सहभागी

📌 30 सप्टेंबर 2020 पर्यंत प्रवेशीका पाठविण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी भंडारा :- लक्ष्मण फुंडे

भंडारा,15 सप्टेंबर :- राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या राज्य पाणी व स्वच्छता मिशन च्या अंमलबजावणीकरिता  ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता या विषयाच्या अनुषंगाने, घोषवाकयासह बोधचिन्ह तयार करण्यासाठी राज्यात बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या प्रवेशीका 30 सप्टेंबर 2020 या कालावधी पर्यंत राज्यास पाठवायच्या असून स्पर्धेकरिता 50 हजार रोख रक्कम पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.  या स्पर्धेमुळे राज्याच्या पाणी व स्वच्छता मिशनला जनसंकल्पनेतून साकारलेले बोधचिन्ह उपलब्ध होणार आहे. भंडारा जिल्हयातील स्पर्धकांनी या मध्ये सहभाग घेवून घोषवाक्यासह बोधचिन्ह निर्माण करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. भूवनेश्वरी एस. यांनी केले आहे.

 राज्याच्या 4 सप्टेंबर 2020 च्या मार्गदर्शन सुचनेनुसार, राज्यात पाणी व स्वच्छता विषयक सुविधांची उपलब्धता करण्यासाठी  राज्यस्तरावर  राज्य पाणी व स्वच्छता मिशन स्थापन करण्यात आले  आहे. या मिशनच्या माध्यमातून राज्यभर जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन 2 कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्यस्तरावर मिशनकरिता ब्रिदवाक्य असलेल्या बोधचिन्हाची आवश्यकता असून भविष्यात ग्रामीण पाणी पुरवठा व ग्रामीण स्वच्छता विषयक सुविधांची उपलब्धता करताना या बोधचिन्हाचा उपयोग राज्यभर केल्या जाणार आहे. त्याकरिता बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्याच्या पाणी व स्वच्छता मिशनला जन संकल्पनेतून साकारले जाणारे बोधचिन्ह मिळणार आहे. या मध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी राज्याच्या वतीने देण्यात आलेल्या निर्देशाचे पालन करून बोधचिन्ह तयार करून स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बोधचिन्ह तयार करताना, ग्रामीण पाणी पुवठा व स्वच्छता विषयाचा सहज बोध होईल् असा बोधचिन्ह (लोगो) असावा. या बोधचिन्हाचे (लोगो) ब्रिदवाक्य मराठी मध्ये आणि मोजक्या शब्दातून असावे.  या स्पर्धेत व्यक्ती, संस्था, जाहिरात संस्था सहभागी होवू शकतील. बोधचिन्ह (लोगो) एकरंगी, बहूरंगी प्रकारात असला तरी चालेले. सहभागींनी राज्यस्तरावर लोगोची सॉफट कॉपी पाठविणे आवश्यक असेल. सोबत संपर्क क्रमांक, पत्ता असणे आवश्यक आहे. ज्या स्पर्धकांच्या बोधचिन्हाची (लोगो) अंतीम निवड होईल, त्यांनी सिडीआर(CDR) फाईल उपलब्ध्ाा करून देणे आवश्यक असेल. बोधचिन्ह (लोगो) अंतीम करण्याचे अधिकार राज्य पाणी व स्वच्छता मिशन ला असतील. ज्या स्पर्धकांच्या घोषवाक्यासहीत बोधचिन्हाची अंतीम निवड होईल, त्यांना रोख 50 हजार रूपये बक्षिस स्वरूपात देण्यात येईल. सहभागी स्पर्धकांनी आपापल्या प्रवेशीका 30 सप्टेंबर 2020 ला  दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातून राज्यस्तरावर प्राप्त होतील याची खबरदारी घ्यावी, अशा सुचना स्पर्धेकरिता राज्यस्तरावरून देण्यात आलेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील व्यक्ती, संस्था, जाहिरात संस्था यांनी जास्तीत जास्त संख्येनी राज्यस्तरीय बोधचिन्ह स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. भूवनेश्वरी एस. यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या