राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्षा ज्योती सोनटक्के यांनी मुलींना वही पेन केली वाटप

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 12/01/2025 7:02 PM

नांदेड :- राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून अर्धापूर शहरातील जय भारत मागास्वर्गीय मुलांचे वसतिगृह येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार गटाच्या युवती जिल्हाध्यक्षा ज्योती सोनटक्के यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आली.प्रथमतः राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यांनंतर अर्धापूर शहरातील गरजू विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे युवा
जिल्हाध्यक्ष अतुल हिंगमिरे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख साबेर यांची प्रमुख उपस्थिती होती.ज्योतीताई सोनटक्के ह्या नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात.आज त्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शहरातील गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करून सामाजिक उपक्रमातून जयंती साजरी केली. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या