राष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्षा ज्योती सोनटक्के यांनी गरजू विद्यार्थ्याना वही पेन देऊन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती केली साजरी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 12/01/2025 7:22 PM

नांदेड :- राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून अर्धापूर शहरात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार गटाच्या युवती जिल्हाध्यक्षा ज्योतीताई सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली गरजू विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आली.राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यांनंतर शहरातील गरजू विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष ज्योतीताई सोनटक्के. यांच्या वतीने वही व पेनचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे युवा
जिल्हाध्यक्ष अतुल हिंगमिरे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख साबेर यांची प्रमुख उपस्थिती होती.ज्योतीताई सोनटक्के ह्या नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असतात. त्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शहरातील गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करून सामाजिक उपक्रमातून जयंती साजरी केली. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या