नांदेड - येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण व्यंकटराव वाघमारे यांनी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेत जाहिर प्रवेश केला असून याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी लक्ष्मण वाघमारे यांची नांदेड उत्तर महानगर अध्यक्षपदी निवड केली. याबद्दल त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी संदिप आडेराव, शिवानंद अण्णा जोगदंड, श्रीनिवास कांबळे, नारायणराव वाघमारे, भीमराव वाघमारे, बालाजी वाघमारे, शिवराज कांबळे यांनी लक्ष्मण वाघमारे यांचे अभिनंदन केले.