भंगार विक्री निविदा प्रक्रीयेत मोठ्या प्रमाणात अनियमितता, प्रशासनाने त्वरीत कारवाई करावी अन्यथा आंदोलन : लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/01/2025 10:52 AM

💥 सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका: भ्रष्टाचाराची गंभीर तक्रार! 💥

महानगरपालिकेतील भंगार विक्री निविदा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे.
👉 सार्वजनिक निधीचे 3 कोटींहून अधिक नुकसान
👉 निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव
👉 नियमांचे उल्लंघन आणि दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

🔴 लोकहित मंचाच्या वतीने आमच्या मागण्या:
1️⃣ दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जावी.
2️⃣ सदर निविदा प्रक्रिया रद्द करून नवीन पारदर्शक प्रक्रिया राबवावी.
3️⃣ महानगरपालिकेच्या निधीचे संरक्षण करून झालेल्या नुकसानीची भरपाई दोषींना करवून घ्यावी.

🚨 सार्वजनिक निधीचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही!
महानगरपालिकेचा निधी हा नागरिकांच्या हितासाठी आहे, तो भ्रष्टाचाराच्या विळख्यात जाऊ देणार नाही. प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल!

#लोकहित_मंच #भ्रष्टाचारविरोधी #सार्वजनिकहित #निविदा_गोलमाल

Share

Other News

ताज्या बातम्या