आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा, दि.: सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार यांनी आज भेट देऊन संग्रहालयातील शिवकालीन वस्तूंची पाहणी करुन माहिती घेतली.
या भेटी प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार दिलीप येळगावकर, संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक प्रविण शिंदे, धैर्यशील कदम यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यात मी पहिल्यांदाच येत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या वाघनख्यांचे दर्शन घेतले. यातून मला प्रेरणा मिळाली असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील गडकिल्ल्यांना पूर्व परिस्थितीत आणण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या आराखड्यानुसार काम सुरु असून गडकिल्ले सुरक्षित व त्यांना वैभव प्राप्त होण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. रायगड किल्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था व समाजातील दानशुर व्यक्तींची मदत घेऊन शिवकालीन किल्यांचे संवर्धन करणार असल्याचेही सांगितले.