*रेल्वे तिकीट एजंटांच्या फसवणूकीमुळे सांगलीकरांचे दर वर्षी एकाच रेल्वे गाडीत रूपये सवा कोटीचे नुकसान*
सांगली ते मुंबई तिकीट ऐवजी कोल्हापूर ते मुंबईचे तिकीट एजंट विकतात
एजंट महालक्षमी एक्सप्रेसची फुल गाडीची तिकीटे ब्लाॅक करून ठेवतात.
महालक्षमी एक्सप्रेसची सांगली ते मुंबई ऐवजी कोल्हापूर ते मुंबईची रेल्वे तिकीटे एजंटांनी विकल्यामुळे सांगलीकरांचे दर वर्षी सवा कोटी नुकसान होत आहे.
रोज सांगलीचे 635 प्रवासी व किर्लोस्करवाडीचे 106 प्रवासी फसवणूकीला बळी पडतात.
वार्षिक सांगली व किर्लोस्करवाडीच्या 2.70 लाख प्रवाशांना एजंटांच्या फसवणूकीमुळे रू दिड कोटीचे नुकसान होत आहे.
तसेच सांगली व किर्लोस्करवाडी स्टेशनचे मिळून दीड कोटी उत्पन्न बुडते
एजंटांनी सांगली ते मुंबई तिकीटे विकावी हे एजंटांना विनंती आहे
एजंटांनी सांगली व किर्लोस्करवाडीची तिकीटे न दिल्यास प्रवाशांनी सांगली जिल्हा नागरीक जाग्रुती मंचकडे तक्रार करावी व स्टेशन मास्तर कडे लिखित तक्रार करा.