मिनकी येथील आत्महत्याग्रस्त पैलवार पिता पुत्राच्या कुटुंबीयांना तातडीने अर्थ सहाय्य करा : खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या तहसील प्रशासनाला सूचना

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/01/2025 7:48 PM

नांदेड : बिलोली तालुक्यातील मिनकी येथील अल्पभूधारक शेतकरी आर्थिक दारिद्र्यामुळे त्याच्या मुलाला मोबाईल घेऊन देऊ शकला नाही. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेतून मुलाचे आत्महत्या नंतर पित्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे . ही घटना अत्यंत हृदयद्रावक घटना असून आर्थिक संकटात आणि नैसर्गिक कचाट्यात अडकलेल्या मिमकी येथील पैलवार कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने अर्थ सहाय्य मिळवून द्यावे अशा सूचना खा.डॉ. अजित गोपछडे यांनी बिलोली तहसील प्रशासनाला दिले आहेत. 
बिलोली तालुक्यातील मिनकी येथील राजेंद्र पैलवार यांना दोन एकर शेती आहे. राजेंद्र पैलवार यांना तीन मुले पत्नी असा परिवार असून  या दोन एकरच्या तुकड्यावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. शेतीवर बँकेचे आणि खाजगी सावकाराचे कर्ज असल्याची माहिती मिळाली आहे. त्यातच उदगीर येथे शिक्षणासाठी असलेले दोन्ही मुलं गावी परतली होती. मकर संक्रांतीच्या तोंडावर आपल्याला नवीन कपडे , शालेय साहित्य आणि मोबाईल घेऊन द्यावा असा तगाडा दहावीत शिकणाऱ्या ओमकार पैलवार याने आपल्या वडिलाकडे लावला होता. मात्र घरात दारिद्र्य असल्याने आपण नवीन मोबाईल घेऊन देऊ शकत नाही अशी माहिती वडिलांनी आपल्या मुलाला दिली होती. मोबाईल मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर नैराशाच्या गर्तेतून  दहावीचा विद्यार्थी ओमकार पैलवार यांने शेतात जाऊन आत्महत्या केली. आपला मुलगा घरी नाही हे लक्षात आल्यानंतर वडील राजेंद्र पैलवार यांनी सकाळी आपल्या मुलाचा शोध घेतला.ते शेताकडे गेला असता लिंबाच्या झाडाला आपला मुलगा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आले. गळफास घेतलेल्या मुलाच्या गळ्या भोवतालचा दोर काढून राजेंद्र पैलवार यांनी त्याच लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. हृदय पिळवळून टाकणाऱ्या घटनेने मानवी मने सुन्न झाली आहेत . त्यामुळे घरातील कर्ता पुरुष आणि उमदा तरुण गमावलेल्या पैलवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने त्यांना सावरण्यासाठी शासनाकडून तातडीने अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी बिलोली तहसीलदार यांनी पाठपुरावा करावा आणि मयत पिता पुत्राच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य मिळवून द्यावे अशा सूचना खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केल्या आहेत.  यासाठी आपणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मदतीसाठी विनंती करणार असल्याचे खा. डॉ. गोपछडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Share

Other News

ताज्या बातम्या