कुपवाडसाठी अभिमानास्पद......! राणाप्रताप क्रीडा मंडळ कुपवाडचा खो- खो खेळाडू सार्थक हिरेकुर्ब याने दिली राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शपथ...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/01/2025 5:42 PM

आदर्श गुरुकुल विद्यानिकेतन,पेठवडगाव ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापुर येथे सुरु असलेल्या ५८ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि.१०/०१/२०२५ रोजी करण्यात झाले.
    या स्पर्धेसाठी देशातील सर्व राज्यांच्या २८ मुलींचे व ३१ मुलांचे खो खो संघ सहभागी आहेत.स्पर्धेतील खेळाडुंना *देशभक्त आर.पी.पाटील विद्यालयात इ. ८ वी मध्ये शिकत असलेला राणाप्रताप क्रीडा मंडळाचा खो खोचा राष्ट्रीय खेळाडु सार्थक संजय हिरेकुर्ब याने महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करत क्रीडा शपथ दिली.*
   राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडुंना शपथ देण्याची बाब आपल्या कुपवाडसाठी गौरवास्पद आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या