सांगली : ता.२७
| आज राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री मा. जयकुमार गोरे यांची जयहिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण, संपर्क प्रमुख महेश मासाळ, विश्वनाथ तुपे, उद्योजक पै. सदाशिव मलगान आदिनी भेट घेऊन निवेदन देण्यात आले..
या प्रसंगी मंत्री महोदय म्हणाले, लहान पणा पासून चंदनदादांचा गुंठेवारी लढा आम्ही पाहत आलोय,यापुढे आपण मंत्रालयात वेळोवेळी येऊन गुंठेवारी प्रश्न उपस्थित करा. त्यांची गांभीर्याने सोडवून राज्यातील सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सर्वोतॊपरी सहकार्य केले जाईल.असे आस्वासन देण्यात आले.
खालील प्रश्न महाराष्ट्रातील जमिनी विषयक गुंठेवरी प्रश्न सोडवण्याची मागणी आपल्या द्वारे सरकारकडे करण्यात आले.
१. ३१ डिसेंबर २०२० अखेर सरकारने मुदत वाढ दिली आहे. राज्यातील आनेक नागरिकांनी गुंठेवरी दस्त ऐवज बंद असल्याने करारपत्र मुखत्यार साठे खत केले आहे अशा नागरिकांचा सव्हे करून तेवढ्याच नागरिकांना मुद्रांक व नोंदणी कायद्वा १९०८ चे कलम १८ मधील पोट कलम १८ अ मध्ये विशेष सूट देऊन या नागरिकांना दस्त ऐवज करण्याची प्रक्रिया सुरू करावी, त्यामुळे सरकारला मोठा महसुल मिळेल. नागरिकांना न्याय मिळेल.
२. निजाम उस्मान अली राजवटीतील इनाम जमिनी वर्ग २ चे वर्ग १ करपैयासाठी मराठवाडा बाजार मूल्याच्या ५ % मूल्याचे आकारणी करून वर्ग १ करण्याचे शासन आदेश जारी केला आहे. त्याप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील सरसकट वर्ग २ चे वर्ग १ करण्यासाठी ५% ची आकारणी करून सरकार ने न्याय द्यावा.
३. गुंठेवारी नागरिकांची प्रशासनात तत्काळ कामे होणेसाठी योग्य ते आदेश व्हावेत. व प्रत्येक महिना अखेरीस झीरो पेंडन्सि केल्यास सामान्य नोगविकांना याय मिळेल.
४. ग्रामीण भागासाठी गावठाण हद्दीपासून २०० मिटर परिधीय क्षेत्रातील नागरिकांची राहती घरे अकृषिक होण्यास सरकार ने मंजूरी दिली आहे. त्यामध्ये हद्द वाढ करून १००० मिटर परिघीय क्षेत्रास वाढ दिल्यास ग्रामीण भागातील गावांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होणार आहे.
गुंठेवारी चळवळीचे जनक,
चंदनदादा चव्हाण, पक्षप्रमुख, जयहिंद सेना, महाराष्ट्र राज्य.