तालुका विधी सेवा समिती धारणी

  • Nitin Ganorkar (Paratwada)
  • Upadted: 03/09/2024 8:06 PM

धारणी (जि. अमरावती) : दिनांक 31.08.2024 रोजी तालुका विधी सेवा समिती धारणी मार्फत ब्रिलियंट इंग्लीश स्कूल धारणी येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वर्ड ट्रायबल डे विषयी सह. दि.न्या.श्री आदित्य चव्हाण साहेब, ट्राफिक रुल विषयी एड.अर्चना पटेल, अँटी रॅगिंग ॲक्ट विषयी श्री सेठमानिक सरकारी अभियोक्ता, युथ डे निमित्त एड.चौकसे यांनी कायदे विषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले. नियोजन श्री रवींद्रजी ढोलवाडे, अधिक्षक, सि.डी.कीनगे, आसरे व बुरघाटे यांनी केले. एड.गोंडणे, एड पिंटू ठाकुर उपस्थित होते. आभार प्रदर्शन श्री जितेंद्र काशीकर वरीष्ठ लिपिक यांनी केले. शाळा उपलब्ध करून देण्यास एड श्री कृष्णा मालवीय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या