धर्मादाय कार्यालय सांगलीतून हलवू नये : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/02/2024 4:47 PM

प्रति
मा.माननीय धर्मादाय सह आयुक्त कोल्हापूर

विषय :- सांगली धर्मादाय कार्यालय जागे बाबत

महोदय 
आमच्या सांगली जिल्ह्यातील धर्मादाय उप आयुक्त कार्यालय हे गेल्या अनेक वर्षांपासून वखार भाग सांगली येथे अपुऱ्या जागेत कार्यरत आहे 
सध्या 25000 हजार पेक्ष्या ज्यास्त संस्था नोंदणीकृत आहेत
सदर संस्थेचे विश्वस्त  वेगवेगळ्या कामासाठी सदर कार्यालयात वेगवेगळ्या तालुक्यातून  कामकाजासाठी ये जा करत असतात 
त्या साठी सदर कार्यालय हे सांगली जिल्ह्यातील मुख्यालय हे सांगली शहर असल्याने सदर कार्यालय हे सांगली शहरात असणे आवश्यक आहे
आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार सदर कार्यालय सांगली शहर मुख्यालय सोडून इतर ठिकानी हवलण्याचे चालू आहे असे समजत आहे 
ह्यामुळे जिल्ह्यातील काम काजासाठी येणाऱ्या विश्वस्त यांना त्रासाचे होणार असून
आम्हा सर्व सांगली जिल्ह्यातील विश्वस्तांकडून विनंती आहे सदर कार्यालय हे सांगली शहर मध्येच व्हावे अशी विनंती आहे.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

प्रत माहिती साठी
मा.जिल्हाधिकारी सांगली जिल्हा 
धर्मादाय उप आयुक्त सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या