ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सुशिक्षित युवकांनी उद्योग धंद्यांकडे वळून विकास साधावा - खा. चिखलीकर


  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 1/20/2022 6:47:16 PM

नांदेड : सुशिक्षित बेरोजगार युवकांनी स्वतःला किंवा नशिबाला दोष देत व्यसनांच्या आहारी जाऊन आपले जीवन बर्बाद करण्यापेक्षा जिद्द व धाडसाच्या बळावर नवनवीन उद्योग धंद्यांकडे वळून स्वतःचा व देशाचा विकास साधावा असे आवाहन नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.वर्कशॉप कॉर्नर, नांदेड येथील रविराज फूट वेअर या शो रुमचे उदघाटन खा. चिखलीकर यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष इंजि. डी. टी. शिपणे (औरंगाबाद) हे होते.खा. चिखलीकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, विपुल चंद्रप्रकाश देगलूरकर या युवकाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन फूट वेअर उद्योगात जाणीवपूर्वक प्रवेश केला आहे. अश्या धाडसी निर्णय घेणाऱ्यांना केंद्र सरकारच्या विविध युवक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य करता येऊ शकते. केंद्र सरकार युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.याप्रसंगी नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, नांदेड उत्तरचे आमदार मोहन हंबर्डे, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, मा. राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव लकवाले (उदगीर), युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे (बुलडाणा), स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधवराव देवसरकर, पारेषण चे कार्यकारी अभियंता संजय नलबलवार, अति. कार्यकारी अभियंता आफताब खान, नगरसेवक बापुराव गजभारे, युवा कार्यकर्ते प्रमोद माळी (बुलडाणा), माणिक गिरगावकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव दुधंबे, तुकाराम टोम्पे, डॉ. नामदेव खंदारे, बालाजीराव दुधंबे, भगवान अन्नपूर्णे, शंकरराव शेळके, यादवराव उतकर, विठ्ठल कौळासकर, हणमंत अडबलवार, सचिन तळेगावकर, विठ्ठल उकंडे, नारायण वाघमारे, तुळशीरामबनसोडे, दादाराव वाघमारे, उत्तम टोम्पे, रमेश अस्वार, हणमंत निंबाळकर, भगवान टोम्पे, नारायण अण्णपुर्वे, विठ्ठल कामळजकर, राजकुमार सोनकांबळे, गौतमदादा भद्रे, अभिषेक वट्टमवार, जगन गोणारकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.महिला समता परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अनिता देगलूरकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. लताताई लकवाले (उदगीर), सौ. शकुंतला उतकर, सौ. डिंपल साळे, श्रीमती हराळे, सौ. मुक्ताबाई चव्हाण, सौ. हैबते, सौ. शिंपल उतकर, सौ. प्रियंका देगलूरकर, सौ. उकंडे, युवा कार्यकर्ते विनोद गंगासागरे, बालाजी टोम्पे, केशव घडलिंगे, अशोक हराळे, बालाजी वाघमारे, शिवराज कांबळे, देविदास टोम्पे, परेश चव्हाण, रामदत्त कामळजकर, सतिष सोनवणे, प्रशांत बत्तलवार, गणेश शर्मा, सूर्यभान आमले यांचीही यावेळी उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बहुजन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गुणवंत मिसलवाड यांनी केले तर रविराज फूट वेअरचे मालक विपुल चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी शेवटी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर उतकर, अभिषेक साळे, हणमंत उतकर, सुरेश वाघमारे, बालाजी कांबळे, नागनाथ कांबळे, विरभद्र गायकवाड, लक्ष्मण हंबर्डे, दिलिप रामदासी, संजय वाघमारे, आर्यदेव उतकर आदींनी परिश्रम घेतले.

Share

Other News