ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

संसरी सोसायटी देणार 15 टक्के लाभांश # ऑनलाइन वार्षिक सभेत निर्णय#


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 9/23/2021 9:05:12 AM

संसरी सोसायटी देणार 15 टक्के लाभांश 
# ऑनलाइन वार्षिक सभेत निर्णय#

देवळाली कॅम्प।वार्ताहर:- नाशिक तालुक्यातील संसरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता चेअरमन कचरू गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने संपूर्ण होऊन एक मताने 15 टक्के लाभांश वाटपाची घोषणा करण्यात आली 
    करोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशान्वये ऑनलाइन पद्धतीने ही सभा घेण्यात आली,यावेळी  संचालक बळवंतराव गोडसे रामकृष्ण गोडसे, काशिनाथ मोजाड, रघुनाथ गोडसे, डॉक्टर शिवराम गोडसे, सुधाकर गोडसे, संतोष कडाळे आदीसह  सभासद ऍड. त्र्यंबकराव गोडसे, बाळासाहेब गोडसे, संभाजी कांबळे, नितीन गोडसे, राजेंद्र मांडे, विजय निसाळ सह सभासद सहभागी झाले होते यावेळी सभेत मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करणे, सन २०२०-२१ चे आर्थिक पत्रकारास मंजुरी ,२०२१-२२ सालाकरता अंदाज पत्रक,२०२२-२३  साला करिता कमाल मर्यादा पत्रकारास मंजुरी व बँकेकडे पाठविणे, 31 मार्च 2021 चा ऑडिट मेमो चे वाचन व दोष दुरुस्ती अहवाल, संचालक मंडळाने ठरविलेल्या नफा वाटपास मंजुरी, लेखापरीक्षक नियुक्ती, थकबाकी वसुली, वार्षिक सभेस अनुपस्थित सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे या विषयांवर चर्चा केली करण्यात आली, प्रारभी संचालक सुधाकर गोडसे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला, तसेच जेस्ट संचालक बळवंतराव गोडसे यांनी थकबाकीदार सभासदांना थकबाकी भरणे सह संस्थेस मदत करण्याचे आव्हान केले, चेअरमन कचरू गोडसे यांनी संस्थेस चालू वर्षी ३२ हजाराचा नफा झाला असून आज अखेर संस्थेचा नफा 9 लाख 96 हजार इतका आहे, आजच्या सभेत 15 टक्के लाभांश वाटपाचा निर्णय मंजूर केल्यानंतर या नफ्यातून इमारत निधी, राखीव निधी, आधी लाभांश निधी, धर्मदाय निधी, निवडणूक निधी वगळता उर्वरित नफा  सभासदांना वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले, डॉ शिवराम गोडसे, रामकृष्ण गोडसे,बाळासाहेब गोडसे यांनीही विविध सूचना मांडल्या, सचिव राजेंद्र अहिरे यांनी प्रशासकीय कामकाज बघितले, यावेळी ऑडिटर कौन्सिल अंड वेल्फेअर असोसिएशनचे संदीप नगरकर  उपस्थित होते, चेअरमन कचरू गोडसे यांनी आभार व्यक्त केले

Share

Other News