आवाहन

अप्पर तहसील कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य, त्वरीत स्वच्छता करण्याची नागरिक जागृती मंचची मागणी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/09/2021 8:32 AM


प्रति,
मा जिल्हाधिकारीसौ,
    सांगली जिल्हा 

विषय :- सांगली अप्पर तहसीलदार कार्यालय परिसरातील अस्वच्छता व सार्वजनिक स्वछता गृह दुरावस्था बाबत

महोदय,

सांगली अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू होऊन एक वर्ष पेक्ष्या ज्यास्त कालावधी झाला आहे. मात्र कार्यालय परिसर अस्वच्छ आहे तसेच भटकी कुत्री सुद्धा मोट्या प्रमाणत आहेत.
ऑफिस मागील बाजूस असलेले सार्वजनिक स्वच्छता गृह अवस्था बघितली तर तेथे कोणी सुद्धा जाऊ शकणार नाही,
सदर परिसराची अवस्था पाहता मोट्या प्रमाणात रोगराई पसरत आहे आणि  कामासाठी येणाऱ्या नागरिकांची व ऑफिस मधील कर्मचारी यांची गैरसोय होत आहे. तरी आपण संबंधित अधिकारी यांना तात्काळ परिसर व  स्वच्छता गृह साफसफाई व दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती आहे.

 सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच,सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या