ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*म्हाडाला सोडतीसाठी ८१२० घरे*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 8/1/2021 5:48:36 PM

⭕बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्प : 
⭕सर्व सदनिका मध्यम आणि उच्च गटासाठीच, 
⭕वरळीतील कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ ........

मुंबई : बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला अखेर सुरुवात होत आहे. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी, १ ऑगस्टला वरळी बी.डी.डीक चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पुनर्वसन इमारतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात येईल. 
वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बी.डी.डी. चाळींतील १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे.
 हे रहिवासी १६० चौ. फुटांच्या घरातून ५०० चौ. फुटांच्या घरात जातील, 
तर दुसरीकडे म्हाडाला विक्रीसाठी ८ हजार १२० घरे उपलब्ध होणार आहेत. 
ही सर्व घरे केवळ मध्यम आणि उच्च गटासाठीच आहेत.
 महत्त्वाचे म्हणजे या पुनर्विकासाद्वारे म्हाडाला मोठ्या संख्येने व्यावसायिक क्षेत्रही उपलब्ध होणार आहे. 
त्यामुळे वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग येथे दुकान, कार्यालय घेण्याची संधीही मिळेल. 
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग चाळीचा पुनर्विकास करण्यात येत आहे.
 तिन्ही ठिकाणांसाठी तीन स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आले आहेत.
 जांबोरी मैदानावरील ४० मजली इमारतीच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाईल.
 तर लवकरच नायगाव आणि ना. म. जोशी येथील कामालाही सुरुवात केली जाणार आहे. 
या तिन्ही ठिकाणच्या प्रकल्पांतून मुंबई मंडळाला आठ हजार १२० घरे सोडतीसाठी मिळणार असून ही घरे मध्यम आणि उच्च गटातील असतील, 
अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली आहे. 
रहिवाशांना ५०० चौ. फुटांची घरे दिली जाणार असून त्यांना १० वर्षे कोणताही देखभाल खर्च भरावा लागणार नाही.
 ज्या रहिवाशांना संक्रमण शिबिर नको आहे. 
त्यांना २५ हजार रुपये दरमहा भाडे दिले जाणार आहे.

Share

Other News