शेळकेवाडी ता. कवठेमहांकाळ येथे अंगणवाडी तटभिंत बांधकाम रस्त्यावर या बाबत मा.रामदास सावंत प्रदेशाध्यक्ष जयहिंद गुंठेवारी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्ना यश मिळाले आहे.
शेळकेवाडी येथे ग्रामपंचायत यांनी मासिक मिटींगमध्ये ठराव घेऊन अंगणवाडी तटभिंत बांधकाम या परवानगी दिली होती परंतु सदर बांधकाम मुख्य चौकात व रस्त्यावर येथे या बाबत कोणतीही चौकशी केली नाही. राष्ट्रीय महामार्ग येथून येणारा एकच मुख्य रस्ता तिथे येतो आणि तिथे चौक आहे. पिढ्यानपिढ्या ग्रामस्थ व एसटी बस अवजड वाहनांना व गावात येणाऱ्या दिंड्या यांना त्रास होणार होता. त्याच चौकातून घाटमात्याकडे रस्ता जातो. सदर तक्रारीबाबत पंचायत समिती कवठेमहांकाळ व काँन्ट्रक्टर यांनी दखल घेऊन, पुढील बाजुने पिलर दोन फूट आत व सुर्यवंशी गल्लीत जाणारा रस्ता बंद होणार होता तिथे ही दोन फूट बांधकाम आत घेऊन क्रॅास बांधकाम घेऊन रस्ता ठेवण्यात आला आहे. पुढे मुख्य चौकात सुध्दा तसेच करून सदर तक्रारीबाबत तोडगा काढला आहे.
धन्यवाद.