अखिल भारतीय आंतर विद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड मुलांचा संघ रवाना

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/01/2026 7:16 PM

नांदेड :- दि.२ ते ५ जानेवारी, २०२६ या कालावधीत चीतकारा विद्यापीठ, पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड मुलांचा संघ सहभागी होणार आहे. संघातील खेळाडू आठवले आयुष, आठवले अमिष, रोहित जोशी, प्रतीक एडके व गिरगावकर कैवल्ले, मार्गदर्शक डॉ.अश्विन बोरीकर, संघ व्यवस्थापक डॉ.राजेंद्र तुपेकर सहभागी होणार आहेत.
नुकत्याच १५ ते १९ डिसेंबर, २०२५ या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले विद्यापीठ, जयपूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेत मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला आहे व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
विजय खेळाडू संघ व्यवस्थापक व मार्गदर्शक यांचे अभिनंदन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर, प्र- कुलगुरू डॉ.अशोक महाजन, कुलसचिव डॉ.ज्ञानेश्वर पवार, क्रीडा संचालक डॉ.भास्कर माने, जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक कदम, संजयसिंह ठाकूर, राम किरकन, शिवाजी हंबर्डे, सुनील लुटे, सुभाष थेटे व रतनसिंग पुजारी विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या