हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त पूर्वतयारीचा आढावा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/01/2026 6:59 PM

नांदेड  :-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज पूर्व तयारी आढावा घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रतिनिधी जगदीश सकवान यांनी प्रस्तावित कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन, सुविधा, सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था तसेच इतर आवश्यक बाबींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी व गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक यांची उपस्थितीहोती.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व गतीने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी दिल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या