गडचिरोली - देवेंद्र देविकार
वंचित बहुजन अाघाडी महिला अाघाडीच्या नेत्या मालाताई भजगवळी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरातील कामगारांना कपडे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात अाला.
कोरोनाच्या लॉकडाऊनमूळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे हाल मोठ्या प्रमाणात होत अाहेत कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झालेले अाहे केंद्र व राज्य सरकार कामगारांच्या बाबतीत मात्र उदासीन अाहे त्यामूळे वाढदिवसाचे अौचित्य साधून कामगारांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन शेकडो कामगारांना कपडे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात अाला.
यावेळी वंचित बहुजन अाघाडीचे जिल्हा प्रभारी बाळू टेंभुर्णे, जिल्हा सचिव योगेंद्र बांगरे, जिल्हा सल्लागार जी के बारसिंगे, युवा नेते गुलाब मुगल, महिला अाघाडीच्या जिल्हा महासचिव सपना रामटेके, युवक अाघाडीचे किशोर फुलझेले, शहराध्यक्ष अनिल निकूरे, भोजराज रामटेके , प्रशांत कस्तूरे, सुनंदा देवतळे, अर्चना चूधरी, सुधिर सोनटक्के, मंगेश कामडी अादि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .