*सेवा संकल्प अभियानांतर्गत भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देवळाली कॅम्प येथे वृक्षारोपण व विशेष विद्यार्थ्यांना स्नेहभोजन*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 17/09/2026 4:11 PM

*सेवा संकल्प अभियानांतर्गत भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देवळाली कॅम्प येथे वृक्षारोपण व विशेष विद्यार्थ्यांना स्नेहभोजन*

प्रतिनिधी lदेवळाली कॅम्प,  - विकसित भारताच्या संकल्पाचा, २५ वर्षांच्या सेवेचा सन्मानाचा, सेवेला साधना मानणारे माननीय प्रधानमंत्री श नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, नाशिक जिल्हा दक्षिण, देवळाली-भगूर मंडळाच्या वतीने सेवा संकल्प अभियान अंतर्गत भव्य कार्यक्रमाचे आयोजन भाजप जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोर यांच्या वतीने करण्यात आले होते.

या अभियानांतर्गत रुसी ईराणी सेंटर, संसरी गल्ली नं. १, लॅम रोड, देवळाली कॅम्प येथे भव्य वृक्षारोपण करण्यात आले. तसेच येथील बौद्धिक विकलांग विद्यार्थ्यांना मिठाई व स्नेहभोजन वाटप करण्यात आले व आशीर्वादाचे दिवे लावण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत दिवाळी सारखा आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी केंद्रातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा या सेवेचा खरा पुरस्कार असल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा व मंडल पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*यावेळी प्रामुख्याने उपस्थित मान्यवर :*

जिल्हा उपाध्यक्ष - * तानाजी भोर*
जिल्हा सरचिटणीस -  शरद कासार*
जिल्हा चिटणीस - *भगवान कटारिया*
दे. भगूर मंडल अध्यक्ष -  प्रसाद आडके 
दे. भगूर मंडल सरचिटणीस - *श्री. प्रकाश कर्डीले, श्री. संदीप शेटे*
दे. भगूर मंडल SC मोर्चा - *विवेक मंडाले*

यासह ज्येष्ठ पदाधिकारी  भरत बलवानी, मधुकर कापसे, मंगेश गुप्ता, विशाल शिरसाट, रोशन चौधरी, नगरसेवक राजेंद्र कासट, भगूर नगरसेवक दीपक बलकवडे, कर्नल आदित्य चौधरी, जीशान खान, इनुस तात्या, प्रवीण दळवी, राजेंद्र जाधव, मृत्युंजय कापसे, ऋषिकेश धनगर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

रुसी ईराणी सेंटर मधील सर्व शिक्षक व स्टाफ यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

सेवा संकल्प अभियान हे दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असून, या अंतर्गत विविध सेवा उपक्रम राबविले जाणार आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या