कुपवाड : प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग अर्थात एमएसएमई उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्याबरोबरच निर्यातीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स, फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कृष्णा व्हॅली चेंबरच्या परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
आजच्या स्पर्धात्मक जागतिक बाजारपेठेत स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांना परदेशी बाजारपेठ मिळवून देणे, आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी थेट संपर्क निर्माण करणे आणि निर्यात व्यवसायाबाबत आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. या कार्यशाळेत परदेशी खरेदीदार कसे शोधावेत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अभ्यास, खरेदीदारांच्या गरजा समजून घेणे, व्यावसायिक वाटाघाटी कशा कराव्यात, आपल्या उत्पादनांचे परदेशी ग्राहकांसमोर प्रभावी सादरीकरण कसे करावे, निर्यात मालाची योग्य किंमत कशी निश्चित करावी, निर्यातीसाठी आवश्यक प्राथमिक कागदपत्रे, निर्यात व्यवसायासाठी उपलब्ध आर्थिक सुविधा व अर्थसहाय्य, त्यांच्याशी संपर्क व संवाद कसा साधावा आणि व्यावसायिक संबंध कसे निर्माण करावेत, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे मोफत असून जागा मर्यादित आहेत. त्यामुळे इच्छुक एमएसएमई उद्योजकांनी वेळेत नोंदणी करावी. कार्यक्रमासाठी नोंदणी अनिवार्य असून सहभागी उद्योजकांकडे उद्यम नोंदणी व आयईसी क्रमांक असणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी या https://forms.cloud.microsoft/r/yfYR5sPuUQ संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करा.
सांगली जिल्ह्यातील एमएसएमई उद्योजकांनी या महत्त्वपूर्ण कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून निर्यात व्यवसायाच्या नव्या संधींचा लाभ घ्यावा आणि आपल्या उद्योगाला जागतिक बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सचे व्यवस्थापक अमोल पाटील यांनी केले आहे.