नूतन विद्यालयात नशा व सायबर गुन्हे या विषयी व्याख्यान
भगूर:देवळाली कॅम्प येथील नूतन विद्यालयात नशा व सायबर गुन्हे या विषयी व्याख्यान देण्यात आले यावेळी व्यासपिठावर देवळाली कॅम्प वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील,संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथराव शेटे, मुख्याध्यापक अनिल कवडे,पर्यवेक्षक गणेश चव्हाण उपस्थित होते.देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी आठवी ते बारावीच्या हजारो विद्यार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नशा व सायबर गुन्हे आजच्या तरुण पिढीसमोर आणि समाजासमोर असलेले दोन गंभीर धोके आहेत.नशामुळे माणसाचा मानसिक नाश होतो तर सायबर गुन्ह्यामुळे डिजिटल माध्यमातून आर्थिक व सामाजिक फसवणूक होते.इंटरनेट मोबाईल किंवा संगणकाचा वापर करून केली जाणारी फसवणूक म्हणजेच सायबर गुन्हा उदा.ऑनलाइन आर्थिक फसवणूक,लॉटरी फेक लिंक्स,युपीआय फ्रॉड,सोशल मीडिया हॅकिंग अश्लील मेसेज पाठवणे कोणत्याही व्यक्तीला ओटीपी पासवर्ड किंवा एटीएम कार्डची माहिती देऊ नका व अनोळखी लिंकवर क्लिक करू नका अशी बरीच माहिती उदाहरणे विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थी दिड तासाच्या प्रबोधनातून मंत्रमुग्ध झाले.यावेळी राहुल बलकवडे,पंढरीनाथ आहेर व शाळेतील शिक्षक प्राध्यापक मोहन साबळे,संतोष दिघे,विक्रम जुनरकर,अमृत गवळी,देविदास वारुंगसे, स्वप्नील कोरडे,ललित भदे,विलास म्हसाळ, सुवर्णा ठाकरे,स्वाती पाटील,सुधा वाघ,श्रद्धा शिंदे,ज्योती गिरासे,ज्योती कापसे,निकुंभ मॅडम,अनंत पवार,सुधीर मेढे, प्रमोद शेटे,निरंजन मोरे,केशव दाते उपस्थित राहून आभार संतोष दिघे यांनी मानले.