प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त;नायगाव पोलिसांची कारवाई

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/08/2026 7:59 PM

नांदेड :- नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशाने सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत नायगाव पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करणाऱ्या इसमाविरुद्ध नायगाव पोलिसांनी कारवाई करून एकूण 1,24,840 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. 24/08/2026 रोजी प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे नायगाव यांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजे रातोळी, ता. नायगाव येथील निळकंठ भुजंगराव पाटील, हा त्याच्या राहत्या घरात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी पोलीस पथकासह शासकीय वाहनाने मौजे रातोळी येथे जाऊन दोन शासकीय पंचांच्या समक्ष नमूद ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान घरातुन 1. सागर पान मसाला 328 पाकिटे -किंमत ₹45,920/- 2. SR-1 सुगंधित तंबाखू - 328 पाकिटे किंमत ₹45,920/- 3. केसरयुक्त विमल पान मसाला 190 पाकिटे -किंमत ₹19,950/- 4. वि-1 तंबाखू 190 पाकिटे किमत ₹8,550/- 5. मुसाफिर पान मसाला 30 पाकिटे- किंमत -₹3,600/- 6. M-4 रॉयल जाफराबादी जर्दा 30 पाकिटे किंमत ₹900/- असा एकूण जप्त मुद्देमाल ₹1,24,840/---किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. सदर मुद्देमाल दोन शासकीय पंचांच्या समक्ष सविस्तर जप्ती पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी निळकंठ भुजंगराव पाटील, वय 60 वर्षे, रा. रातोळी, ता. नायगाव याच्याविरुद्ध पोलीस ठाणे नायगाव येथे गुन्हा रजि. नं. 189/2026 कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील कलम 59(1) (2) व नियम 2011 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड, यांच्या आदेशाने श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, मा. सूरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्याम पानेगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग बिलोली यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक/अमोल भगत, पोउपनि / गजानन तोटेवाड व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार शिवशंकर शिंदे, शिंदे, पाटील व महिला अंमलदार वायकुळे (पोलीस ठाणे नायगाव) यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधीत गुटखा व पानपसाल्याची अवैध वाहतुक व विक्री रोखण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीसांकडुन सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या