कुपवाड शहराच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा !!!

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/08/2026 7:32 PM

उपमहापौर मा. गजानन भाऊ मगदूम यांच्या नेतृत्वाखाली व सातत्यपूर्ण प्रयत्नातून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कुपवाड शहरातील सि.सं. नं. ७७४, मेन रोड, कुपवाड येथे १०० फूट उंचीचा भारतीय तिरंगा ध्वज व कै. मा. आ. शरद पाटील स्मृती उद्यान उभारण्यात येणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ आज सकाळी उत्साहात संपन्न झाला.
या भूमिपूजन समारंभास
मा. ना. #चंद्रकांतदादा पाटील
उच्च व तंत्रशिक्षण व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री, सांगली जिल्हा,
मा. #खासदार विशालदादा पाटील
आणि
मा. श्री. #धीरज सूर्यवंशी
महापौर, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका
यांच्या शुभहस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर, मा. जयश्री ताई पाटील, मा. पृथ्वीराज बाबा पाटील, सर्व नगरसेवक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच नाथाभाऊ शेवाळे प्रदेशाध्यक्ष जनता दल, रतन काकू शरद पाटील सरोजिनी रायनाडे व शरद पाटील सरांचे सर्व कुटुंब उपस्थित होते.

   १०० फूट तिरंगा हा कुपवाडच्या अभिमानाचे आणि देशभक्तीचे प्रतीक ठरेल, तर कै. मा. आ. शरद पाटील स्मृती उद्यान हे नागरिकांसाठी सुंदर व प्रेरणादायी ठिकाण म्हणून विकसित होईल.
कुपवाडच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने  उपमहापौर गजानन भाऊ मगदूम हे प्रयत्न करत आहेत .

विकासाची ही वाटचाल अशीच अविरत सुरू राहील..!!

Share

Other News

ताज्या बातम्या