नांदेड :- कै.शिवराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित तोटेवाड फिजिकल अकॅडमी नांदेडच्या 2025-26 मधील महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये निवड झालेल्या पुरुष व महिला अशा यशवंत विद्यार्थी व त्यांच्या आई-वडिलांचा भव्य सत्कार समारंभ सोहळा दि.5 मे 2026 वार मंगळवार रोजी ताज पाटील हॉटेल नांदेड मध्ये संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री सुरज गुरव व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.भास्कर माने तसेच एमजीएम कॉलेजमधील पत्रकारिता महाविद्यालयाचे प्रा.मा.डॉ.गणेश जोशी तसेच भुजंगराव पा.डक आणि नंदू पा.वैद्य,शिवकुमार बैनवाड,यश महाराज,अक्षय मुपडे,कल्याण पा.शिंदे सुशांत पोले व अकॅडमीचे आजी माजी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.यावर्षी तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे एकूण 22 विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली असून त्यांचा आज त्यांच्या पाल्यांसह भव्य सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची प्रस्तावना अकॅडमीचे संचालक संभाजी तोटेवाड यांनी मांडली व मान्यवरांचेही मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शंकर पुरी यांनी केले तर सूत्रसंचालन मारोती मोरे यांनी केले.