राजकीय, सामाजिक यशात भगूर चा. वाटा महत्वाच :-निवृत्तीराव अरिंगळे

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 04/05/2026 12:59 PM


राजकीय, सामाजिक यशात भगूर चा. वाटा महत्वाचा.     निवृत्तीराव अरिंगळे                  

माझ्या महाविद्यालयीन, बँकिंग क्षेत्रात भगूर कर मित्रांनी अत्यंत मोलाची साथ दिल्यामुळेच मी आज सार्वजनिक क्षेत्रात कार्य करू शकलो म्हणूनच भगूर करांनी हक्काने येऊन माझ्याकडे येऊन कार्य करून घ्यावे असे प्रतिपादन नाशिक रोड व्यापारी सह. बँकेचे चेअरमन निवृत्तीराव अरिंगळे यांनी केले.      भगूर येथील "विराम" फाउंडेशन च्या वतीने आज विविध क्षेत्रातील मान्यवरांच गौरव आज आनंदवन मिसळ येथे संपन्न झाला. त्या प्रसंगी सत्कारार्थी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रम अध्यक्ष स्थानी सेवानिवृत पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश पवार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ठाणे गुन्हे शोध पथक उपायुक्त शेखर बागडे हे होते. प्रारंभी फाउंडेशन अध्यक्ष प्रशांत कापसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सांगितले की स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या या पुण्य भूमीत अनेक रत्न जन्माला आले त्यांचे यश पाहून आनंद होतो. म्हणूनच त्यांचे कौतुक करावे हे आपले कर्तव्यच आहे. या प्रसंगी व्यापारी बँक चेअरमन निवृत्तीराव अरिंगळे, अंबड मॅनेयुफॅक्चेरिंग अध्यक्ष राजेंद्र पानसरे, ठाणे पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, शिक्षक पतसंस्था उपाध्यक्ष संग्राम करंजकर यांचा विविध निवडीबद्दल व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तानाजी आबा करंजकर यांच्या वाढदिवसाबद्दल शाल व पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला, या प्रसंगी सर्वश्री रमेश पवार, शेखर बागडे, तानाजी करंजकर, संग्राम करंजकर, अनिल पवार, राजेंद्र पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमास भगूर नगर पालिका उपाध्यक्ष प्रसाद आडके, जेष्ठ नगरसेवक दीपक बलकवडे, ज्येष्ठ संचालक मनोहर कोरडे. बाबा सदाफुले. विशाल बलकवडे, अनिल पवार, उद्योजक बंडू नाना शिंदे पत्रकार सर्वश्री सुधाकर गोडसे . विलास भालेराव, सुभाष कांडेकर, पहिलवान ग्रुप अध्यक्ष प्रवीण पाळदे. प्रताप करंजकर. चेतन बागडे. भारत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते . सूत्रसंचलन पत्रकार सुधाकर गोडसे, यांनी तर आभार दीपक बलकवडे यांनी मानले

Share

Other News

ताज्या बातम्या