परमेश्वराचे दुसरे रूप म्हणजे आई- डॉ.धाराशिव शिराळे

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 05/05/2026 6:26 PM

​नांदेड : संस्काराचे विद्यापीठ म्हणजे आई असते. निर्मोही , निस्सिम भावनेने आपल्या बाळावर प्रेम करणारी ती माऊली म्हणजे साक्षात परमेश्वराचे दुसरे रूप असते. जगात प्रत्येक व्यक्ती कार्य करतात त्या कार्यामागे कुठला न कुठला स्वार्थ असतो पण आई एक अशी मूर्ती आहे ती आपल्या लेकराच्या जीवनासाठी निरपेक्ष भावनेने चंदनाप्रमाणे झिजते, ऊन वादळ पाऊस वारा दुःख संकटे या सर्वांवर मात करत तिचा एकच उद्देश असतो आपले लेकरू घडले पाहिजे त्याच्या जीवनात सुख आले पाहिजे अर्थात आई ही आपल्यासाठी देवच असते असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक, शिवाजी महाविद्यालय हिंगोली येथील प्रा. डॉ. धाराशिव शिराळे यांनी 
'समस्त उन्हाळे परिवार' यांच्या वतीने मातोश्री, कै. चंद्रभागाबाई पांडुरंगराव उन्हाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून अत्यंत भावपूर्ण वातावरणात समाधी स्थापना व व्याख्यानाचे आयोजन ३ मे २०२६ (रविवार) रोजी येथील ग्लोरियस इंग्लिश मीडियम स्कूल, बापूसाहेब नगर, मुदखेड येथे संपन्न झाला.
या समारंभास दत्तात्रय तोटावाड, प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. धाराशिव शिराळे.
तसेच प्रमुख उपस्थिती श्री दत्तात्रय नरावाड, सायना तोटावाड, भगवानराव आंबटवाड, भगवानराव पालेपवाड, विठ्ठल ताकबिडे, संजय कोठाळे, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजक शिक्षक नेते श्री मधुकर उन्हाळे यानी प्रस्ताविक केले.
आपल्या प्रिय मातेच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात परिसरातील नागरिक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​'आईची महती'  विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते प्रा. डॉ. धाराशिव शिराळे (श्री शिवाजी महाविद्यालय, हिंगोली) यांनी आपल्या ओघवत्या शैलीत आईच्या त्यागाचे आणि प्रेमाचे महत्त्व विशद केले. "आई म्हणजे ईश्वराचे रूप असून, तिच्या निस्वार्थ प्रेमाची आणि संस्कारांची जागा जगात दुसरी कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाही," असे भावनिक प्रतिपादन त्यांनी आपल्या व्याख्यानात केले. उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत त्यांनी आईच्या ऋणातून कधीही मुक्त होता येत नाही, हा संदेश आपल्या प्रभावी भाषणातून दिला.
 समकार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू टेकले यांनी केले तर आभार प्रदर्शन शशिकला उन्हाळे यांनी मानले.आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. या समारंभास जिल्हाभरातून आलेल्या अनेक शिक्षकांची उपस्थिती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या