सांगलीत भाजपाचा " जल्लोष "...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/05/2026 1:56 AM

पश्चिम बंगाल, आसाम आणि पौंडीचेरी येथील विधानसभा निवडणुकांमध्ये मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम व दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशाचा आज आमदार सुधीरदादा गाडगीळ  जनसंपर्क कार्यालयात भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी विशेषतः एल.ई.डी स्क्रीनची व्यवस्था करून मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे प्रेरणादायी संबोधन सर्वांनी एकत्रितपणे पाहिले. या ऐतिहासिक विजयाने जनतेचा विकासाभिमुख धोरणांवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भाजपा सदैव कटिबद्ध राहील, याचा पुन्हा एकदा निर्धार करण्यात आला.

यावेळी भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, सौ.मंजिरीताई गाडगीळ, सांगली मनपा स्थायी समिती सभापती अतुल माने, भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक विश्वजीत पाटील, समाज कल्याण सभापती गीताताई पवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस स्मिताताई भाटकर, नगरसेवक आणि नगरसेविका, मंडलध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख आदी सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या