मुदखेड येथे 'कै. चंद्रभागाबाई उन्हाळे' यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समाधी स्थापना व व्याख्यान कार्यक्रम संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 04/05/2026 5:25 PM

​नांदेड : मुदखेड येथील 'समस्त उन्हाळे परिवार' यांच्या वतीने, आपल्या लाडक्या मातोश्री,कै. चंद्रभागाबाई पांडुरंगराव उर्फ अग्नीमुनिजि उन्हाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून अत्यंत भावपूर्ण वातावरणात समाधी स्थापना व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम नुकताच ३ मे २०२६ (रविवार) रोजी येथील ग्लोरियस इंग्लिश मीडियम स्कूल, बापूसाहेब नगर, मुदखेड येथे संपन्न झाला.
आयोजित कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय तोटावाड,प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.डॉ.धाराशिव शिराळे.
तसेच प्रमुख उपस्थिती श्री दत्तात्रय नरावाड,सायना तोटावाड, भगवानराव आंबटवाड,भगवानराव पालेपवाड,विठ्ठल ताकबिडे, संजय कोठाळे,यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाची सुरुवात कै. चंद्रभागाबाई उन्हाळे यांना विनम्र अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर उन्हाळे यानी केले.
आपल्या प्रिय मातेच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात परिसरातील नागरिक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​'आईची महती' या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे 'आईची महती' या विषयावर आयोजित केलेले विशेष व्याख्यान. या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते प्रा.डॉ.धाराशिव शिराळे (श्री शिवाजी महाविद्यालय, हिंगोली) यांनी आपल्या ओघवत्या शैलीत आईच्या त्यागाचे आणि प्रेमाचे महत्त्व विशद केले. "आई म्हणजे ईश्वराचे रूप असून, तिच्या निस्वार्थ प्रेमाची आणि संस्कारांची जागा जगात दुसरी कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाही,"असे भावनिक प्रतिपादन त्यांनी आपल्या व्याख्यानात केले.उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत त्यांनी आईच्या ऋणातून कधीही मुक्त होता येत नाही,हा संदेश आपल्या प्रभावी भाषणातून दिला.यावेळी बालाजी बेंबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.. 
​समाधी स्थापना विधी
कार्यक्रमाच्या निमित्ताने समाधी स्थापनेचा विधी देखील संपन्न झाला.​या कार्यक्रमाचे नियोजन 'समस्त उन्हाळे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमस रामेश्वर कोरबनवाड शंकरराव मासेनवार प्राध्यापक नरेंद्र कंचटवार डॉ.पल्लवी उन्हाळे नरावाड संभाजीराव पाडदेवाड आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू टेकले यांनी केले आईच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक करण्यात येत आहे.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू टेकले यांनी तर आभार प्रदर्शन शशिकला उन्हाळे मासेनवार यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या