जनगणना २०२७ - नांदेड शहरात स्व-गणनेचा शुभारंभ

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 02/05/2026 8:43 PM

नांदेड :भारताची पहिली डिजिटल जनगणना (जनगणना २०२७) करण्याच्या दृष्टीने आज नांदेडमध्ये महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या *महापौर सौ.कविता संतोष मुळे* आणि *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे* यांनी आज स्वतःची माहिती ऑनलाइन नोंदवून शहरात 'स्व-गणना' मोहिमेचे उद्घाटन केले.

सदरील स्व-गणनेची सुविधा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध असेल. नागरिकांना कोणत्याही प्रगणकाची (Enumerator) वाट न पाहता स्वतःच्या कुटुंबाची माहिती सरकारी पोर्टलवर सुरक्षितपणे भरता यावी, हा या मोहिमेचा उद्देश आहे. नागरिकांनी अधिकृत जनगणना पोर्टलवर जाऊन आपली माहिती भरायची आहे. माहिती यशस्वीरित्या भरल्यानंतर एक SE ID (Self-Enumeration ID) जनरेट होईल, जो जतन करून ठेवणे आवश्यक आहे. या मोहिमेच्या पुढील टप्प्यात ज्या नागरिकांनी स्व-गणना केली नाही, त्यांच्या घरी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करतील.

*महापौरांचे प्रतिपादन*
या प्रसंगी बोलताना **महापौर सौ.कविता संतोष मुळे** यांनी आवाहन केले की, "नांदेडकरांनी या पहिल्या डिजिटल जनगणनेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा. स्व-गणनेमुळे वेळेची बचत होईल आणि अचूक माहिती संकलित करण्यास मदत होईल. विकासाच्या नियोजनासाठी जनगणना अत्यंत महत्त्वाची असल्याने प्रत्येक नागरिकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे".

*पालिका आयुक्तांचे आवाहन*
त्याचप्रमाणे "जनगणनेची आकडेवारी ही भविष्यातील शहर नियोजन, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि आरोग्य व्यवस्था यांच्या आराखड्याचा पाया असते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपली माहिती पूर्णतः सत्य आणि अचूक भरावी," असे आवाहन *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे* यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या