खेळाडू प्रोत्साहन हँडबॉल स्पर्धेत पोदार स्कूल विजेते

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/05/2026 1:51 AM

सांगली -४- सांगली डिस्ट्रिक्ट हॅण्डबॉल असोसिएशन यांनी शिवशक्ती मंडळाच्या क्रीडांगणावर हॅण्डबॉल खेळाडू‌साठी प्रोत्साहनपर घेतलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित मुले-मुली स्पर्धेत मुलांचा गटात पोदार इंटरनॅशनल स्कूलने मदनभाऊ मुवा मंचवर 26-14असा पराभव करून रोख पारितोषिक आणि कै. बाबासो भगवान चव्हाण चषक पटकावला.
          संघटनेच्या अध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात नऊ तर मुलींच्या गटात सहा संघ सहभागी झाले होते. सकाळ सत्रातील बाद फेरीच्या सामन्यातून मुले गटात रामानंदनगर, जयंत स्पोर्टस ईश्वरपूर, मदनभाऊ युवामंच आणि पोदार स्कूल तर मुलींच्या गटात देशिंग हायकूल, ए.बी. पाटील इंग्लिश स्कूल, मदनभाऊ युवा मंच आणि पोदार स्कूल यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुपार सत्रात मुलीच्या उपांत्य फेरीत युवामंचने देशिंगचा तर पोदार स्कूलने ए.बी. पाटील इंग्लिश स्कूल सांगलीचा पराभव झाला. तृतिय क्रमांकाच्या सामन्यात ए. बी. पाटील इंग्लिश स्कूल सांगलीने देशिंग हायस्कूलवर 22-18 अशी मात करून तृतिय क्रमांक पटकावला. मुलींच्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात मदनभाऊ पाटील युवा मंच सांगलीने पोदार इंटरनॅशनल स्कूलचा 19-12 ने पराभव करून रोख पारितोषिक व कै. ताराबाई बाळासो चव्हाण चषकावर आपले नाव कोरले. मुलांच्या तृतिय क्रमांकाच्या सामन्यात जयंत स्पोर्टस् अकॅडमी ईश्वरपूरने रामानंदनगर स्पोर्टस अकॅडमीचा 11-1 असा एकतर्फी पराभव करून तृतिय क्रमांक पटकावला. मुलांचा अंतिम सामनाही चुरशीचा झाला. पोदारचा सर्वेश पाटीलने आठ गोल करून झंझावती रथ कायम ठेवला. त्याला प्रज्वल शिर्के आणि आर्यन कोळेकरने प्रत्येकी ४-४ गोलकरून मोलाची साथ दिली. मदनभाऊ युवामंचचा गौरव कोळी, निखिल जाधवने प्रत्येकी सहा- सहा गोल करून लढत दिली. सर्वेश पाटीलच्या उत्कृष्ठ कामगिरीवर पोदारने हा सामना 26-14 असा जिंकला. हॅण्डबॉल संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी रोख पारितोषिके आणि खेळाडूंची मोफत भोजन व्यवस्था केली होती. सौ. पुजा पाटील यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ आकर्षक चषक दिले.
          या स्पर्धेचा बक्षीस समारंभ उपमहापौर आणि संघटनेचे उपाध्यक्ष गजानन मगदूम, उपाध्यक्ष प्रा. प्रदीप कुमार चव्हाण, खजिनदार प्रा. हर्षकुमार पाचोरे, सौ. पुजा पाटील यांच्या हस्ते पार पडला. या स्पर्धा यशस्वीनेसाठी स्वप्निल कदम (सनी सर), स्वप्निल मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. पियुष पाटील, धीरज बाबर, प्रथमेश हडपद, वरद पवार, संस्कार हेराळे, नवेद आणि अज्जिम सारवन यांनी पंच म्हणून काम केले.

Share

Other News

ताज्या बातम्या