महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भेट घेऊन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगली-मिरज-कुपवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली.
यावेळी जागतिक बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
यामध्ये विशेषतः वारणा नदी उद्भव आधारित पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ४५४ कोटी रुपये तसेच शेरीनाला वखारभाग उंच मलशुद्धीकरण केंद्र उभारणी व इतर अनुषंगिक कामांसाठी सुमारे ९३.५० कोटी रुपये निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.
सांगली-मिरज-कुपवाड शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची असून, मा.मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.