महामानवांच्या प्रतिमेला वंदन करून अपक्ष उमेदवार अनिता रणपिसे यांच्या प्रचाराची सुरुवात

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 02/02/2026 3:30 PM

  


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

अंगठी चिन्हावर मागितली मते; घरोघरी प्रचारावर भर
मतदारांकडून मिळतोय सकारात्मक आणि उस्फूर्त प्रतिसाद

गोंदवले:पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत अपक्ष उमेदवार अनिता तानाजी रणपिसे यांनी आपल्या प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला असून, गोंदवले बु!! गणातील मतदारांकडून त्यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. अंगठी ' चिन्हाचा प्रचार

अनिता रणपिसे या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून, त्यांना 'अंगठी ' हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गोंदवले गणात प्रचार फेरी काढली. “ गोंदवले गणातील गावांच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मला 'अंगठी ' या चिन्हासमोर बटण दाबून विजयी करावे,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.

मतदारांचा वाढता पाठिंबा

प्रचारा दरम्यान महिला आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना अनिता रणपिसे यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गणातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून मतदार त्यांच्याकडे पाहत असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितल आहे.



Share

Other News

ताज्या बातम्या