' तो' जीवघेणा खड्डा त्वरीत बुजवा : लोकहित मंचची मनपा आयुक्तांकडे मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/02/2026 9:09 AM

सांगली शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेल्या मारुती रोडवरील आनंद टॉकीज परिसरात रस्त्याच्या मधोमध पडलेला मोठा खड्डा (बगदाद) वाहनधारकांसाठी 'डेथ ट्रॅप' ठरत आहे. हा खड्डा तातडीने न बुजवल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असून, महापालिकेने याकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी 'लोकहित मंच' संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.मारुती रोड हा मुख्य बाजारपेठेचा भाग असल्याने येथे चोवीस तास वर्दळ असते.रात्रीच्या वेळी हा खोल खड्डा न दिसल्याने दुचाकीस्वार पडण्याचे प्रकार घडत आहेत.रस्त्याच्या मधोमध असलेल्या या खड्ड्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे, परिणामी परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे.सध्याच्या परिस्थितीत कोणताही मोठा अनर्थ घडण्यापूर्वी संबंधित विभागाने या खड्ड्याचे डांबरीकरण करून रस्ता पूर्ववत करावा.
प्रशासनाला इशारा:
प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी. 

आपला नम्र,
मनोज भिसे
लोकहित मंच, सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या