नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे दि.३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मुख्य प्रशासकीय इमारत,स्थायी सभागृह कक्ष, येथे *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या प्रमुख उपस्थितीत *“हुतात्मा दिना”* निमित्त दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून स्वातंञ्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
हुतात्मा दिन भारतात प्रामुख्याने ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते. या दिवशी सकाळी ११ वाजता संपूर्ण देशात दोन मिनिटांची स्तब्धता पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार,उपआयुक्त अभिजित वायकोस,उपआयुक्त स.अजितपालसिंग संधु,सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे, वरिष्ठ लिपिक संतोष जोशी, स्विय सहाय्यक महेश आसने यांच्यासह मनपातील इतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.