शिवशंभू चौक ते कर्नाळ पोलीस चौकी पर्यंतचा रस्ता करण्यासाठी सदर ठिकाणची वाहतूक सहा महिन्यासाठी बंद करण्यात येणार आहे.
सदर रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे तसेच महापुराचे पाणी आल्यानंतर तात्काळ रस्ता बंद पडतो त्यामुळे पुलाची उंची सुद्धा वाढवण्यात येणार आहे
त्यामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे अशा आशयाचे नोटिफिकेशन जिल्हाधिकारी यांनी काढले आहे
माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग असेल वाहतूक शाखा असेल सर्वांना विनंती आहे पर्यायी वाहतूक व्यवस्था त्या ठिकाणची कामे तातडीने करून रस्ता पूर्ण क्षमतेने रुंद करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत ठेवली पाहिजे अन्यथा फार मोठा वाहतुकीचा बोंजवारा उडणार आहे.
चिंतामण नगर चा रेल्वे पूल असेल आयर्विन पुलाचे काम असेल यावेळी वाहतूक बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती याची दक्षता सर्वांनीच घ्यावी व सर्व वाहनधारकानी सुद्धा प्रशासकीय कामासाठी मदत करून स्वतःची काळजी स्वतःच घेऊन वाहतूक केली पाहिजे.
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा