नांदेड :- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाच्या एमएसएमई विकास कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथील लोकमान्य मंगल कार्यालय येथे दि. ४ ते ६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन व विक्री कार्यक्रम दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांकडे पीएम विश्वकर्मा आयडी असणे अनिवार्य असून, पात्र लाभार्थ्यांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या प्रदर्शन व विक्री उपक्रमातून १८ प्रकारच्या पारंपारिक कारागीर व शिल्पकारांना लाभ मिळणार आहे. यामध्ये कारपेंटर, नाव बनविणारे कारागीर, शस्त्र बनविणारे, मूर्तिकार, मोची, कुंभार, लोहार, कुलूप बनविणारे, हातोडा व टूलकिट तयार करणारे, सोनार, राजमिस्त्री, डाळ बनविणारे, चटई व झाडू बनविणारे, मालाकार, धोबी, टेलर, बाहुली व खेळणी बनविणारे तसेच मासोळीचे जाळे तयार करणारे कारागीर यांचा समावेश आहे. या कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री येथे करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनासाठी नागरिकांसाठी प्रवेश पूर्णतः मोफत असल्याची माहिती एमएसएमई विकास कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या माहिती शाखेने दिली आहे.
अधिक माहितीसाठी
गौरव यादव – ८६००८४२६०१,
नीरज कुमार देशपांडे – ७०५३१२५५९१,
के. जे. कांबळे – ८४२१५९२९९५,
राजकुमार – ८२९८६३२१४५
यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.