आवाहन

राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केले लोकहित मंचच्या सामाजिक व विधायक कार्याचे कौतुक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/10/2025 11:33 PM

    .सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील विविध समस्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकहित मंचच्या कार्याचे आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी कौतुक केले.
        त्या आज सांगली दौऱ्यावर आल्या होत्या.आढावा बैठका आणि इतर कामांचा व्याप असतानाही त्यांनी माझ्या घरी भेट देऊन मी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची चौकशी करत दखल घेत कौतुक केले. इथून पुढच्या काळातही समाजासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्ध लोकहित मंचने जनतेचा आवाज बनून उठाव करावा. यासाठी जेव्हा जेव्हा आमची मदत लागेल त्यावेळी आम्ही नक्कीच तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू असा विश्वासही दिलाय.
         यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे (सर), अमोल भिसे, वेदांत भिसे आदि उपस्थित होते.

 *मनोज भिसे- अध्यक्ष लोकहित मंच सांगली*

Share

Other News

ताज्या बातम्या