आवाहन

मिरज बेळगाव मिरज स्पेशल १५ आक्टोंबर पासून नियमित पँसेजर म्हणून धावणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/10/2025 12:39 PM

   मिरज–बेळगाव - मिरज विशेष गाड्यांचे नियमितीकरण करण्यात आले असुन रेल्वे बोर्डाने गाडी क्रमांक 07301/07302 बेळगाव–मिरज–बेळगाव आणि 07303/07304 बेळगाव–मिरज–बेळगाव अनारक्षित दैनंदिन पँसेंजर विशेष गाड्या नियमित करण्यास मान्यता दिली आहे.

त्यानुसार या गाड्यांना नवीन क्रमांक देण्यात आले आहेत गाडी क्रमांक 51461/51462 बेळगाव–मिरज–बेळगाव आणि 51463/51464 बेळगाव–मिरज–बेळगाव दैनंदिन पँसेंजर गाड्या अनुक्रमे.गाडी क्रमांक 51461 बेळगाव–मिरज दैनंदिन पँसेंजर सकाळी 05:45 वाजता बेळगावहून सुटेल आणि त्याच दिवशी 09:00 वाजता मिरजला पोहोचेल.
परतीच्या दिशेने, गाडी क्रमांक 51462 मिरज–बेळगाव दैनंदिन पँसेंजर सकाळी 09:55 वाजता मिरजहून सुटेल आणि त्याच दिवशी 01:00 वाजता बेळगावला पोहोचेल.
                  गाडी क्रमांक 51463 बेळगाव–मिरज दैनंदिन पँसेंजर  दुपारी 01:30 वाजता बेळगावहून सुटेल आणि त्याच दिवशी 04:30 वाजता मिरजला पोहोचेल.
परतीच्या दिशेने, गाडी क्रमांक 51464 मिरज–बेळगाव दैनंदिन पँसेंजर सायंकाळी 07:10 वाजता मिरजहून सुटेल आणि त्याच दिवशी 10:25 वाजता बेळगावला पोहोचेल.
                या नियमित गाड्यांची अंमलबजावणी 15 ऑक्टोबर 2025 पासून करण्यात येणार आहे.
यामुळे बेळगाव आणि मिरज दरम्यान अनारक्षित प्रवाशांसाठी सोयीस्कर दैनंदिन पँसेंजर सुविधा उपलब्ध होईल. याचा स्थानिक प्रवाशांनी व नागरीकांनी लाभ घ्यावा असे अवाहन   रेल्वे प्रवासी संस्थाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, नंदकुमार गौड, सोपान भोरावत,वाय.सी.कुलकर्णी,मधुकर साळुंखे,पंडितराव कराडे (तात्या),पांडुरंग लोहार व एकनाथ पोतदार यांनी केले आहे.
           आमच्या मागणीची दखल घेऊन दिवाळीच्या सणासुदीच्या काळामध्ये दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडुन मिरज बेळगाव मिरज विशेष गाडीचे पॅसेंजर म्हणुन सुरू करण्यात आल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे विशेष आभार मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी मानले.

Share

Other News

ताज्या बातम्या