आवाहन

जय हिंद सेना करणार कुपवाड गाव चावडी तलाठी कार्यालयाचा पंचनाम,

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/10/2025 10:23 PM

कुपवाड गाव चावडी तलाठी कार्यालयाचा "जय हिंद सेना "स्वतः हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पंच नामा करणार असा इशारा चंदनदादा चव्हाण यांनी दिला आहे.

कुपवाड : कुपवाड गाव चावडी तलाठी कार्यालयात नोंदीसाठी हसबे नावाचा तलाठी प्रती गुंठ्याला दहा हजाराची मागणी करत असून त्यांचा पुराव्यानिशी जय हिंद सेना पुढील आठवड्यात कुपवाड चावडी समोर भंडाफोड करणार.

कुपवाड येथील तलाठी हसबे याने एका महिलेच्या नोंदीसाठी रु दहा हजाराची लाच मागितली आहॆ. त्याची तक्रार आली असून. ज्या गुंठेवारी धारकांना पालिकेचे प्रमाण पत्र आहॆ त्यांच्याच नोंदी घालण्याच्या भीती दाखवून पैसे उकलण्याचा उद्योग सुरु केलेला आहॆ. कायद्यात ज्या व्यक्तीचे खरेदी दस्त ऐवज झाला आहॆ मात्र प्रमाण पत्र घेतले नाही अशा नागरिकांच्या नोंदी घालण्यात येत नाहीत असे करण देणे म्हणजे बेकायदेशीर व मनाचा निर्णय घ्यायला यांना कोणी अधिकार दिला. कुपवाड शहर जागृत असून ज्यांना तलाठी कार्यालयात नोंदीसाठी अडवणूक व पैसे मागितले जात असतील तर त्यांनी तात्काळ जय हिंद सेनेच्या पदाधिकारी यांना याची माहिती देणेत यावी अशा लाचखोर भ्रष्ट तलाठ्यांचा बंदोबस्त केल्या शिवाय जय हिंद सेना गप्प बसणार नाही. या हरामखोरांना सरकार पगार देत आहॆ. एक महिन्या हुन अधिक काळ नोंदीचे कामास विलंब केल्यास त्यांना दप्तरं दिरंगाई कायदाच दाखवूच शिवाय त्यांना जनहितार्थ जय हिंद सेना काय करू शकते याचा प्रत्यय आल्या शिवाय राहणार नाही.

गेल्या दोन महिन्या पूर्वी मिरज तहसीलदार यांच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे मिरज वेशीवर टांगत तहसीलदार कार्यालयावर बोंबा बोंब आंदोलन करून शिवाय राज्याचे अवर सचिव विकास खारगे यांच्या समोर जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन पुराव्यानिशी सादर करून जनतेला केव्हा न्याय देणार अशी भूमिका घेतली आहॆ. कायदा हातात घ्यायची वेळ जय हिंद सेनेला आणू नका. असा गंभीर इशारा सुद्धा कलेक्टर उपस्थित राज्य सरकारचे प्रतिनिधी खरगे साहेब यांचे कडे केली आहॆ. शिवाय मिरज तालुका भ्रष्टाचार मुक्त केला आहॆ अशी घोषणा जयहिंद सेनेने बोंबाबोंब मिरज तहसीलदार कचेरीवर मोर्चात केली आहॆ. मात्र भ्रष्ट तलाठी यातून शहाणे होणार नसतील तर जय हिंद सेना पुन्हा जनतेला न्याय देण्यासाठी कायदा हातात घेतल्या शिवाय राहणार नाही याची भ्रष्ट अधिकाऱ्यांनी दाखल घ्यावी. अन्यथा कायदा काय असतो ती दाखवून कुपवाड जनतेला न्याय दिल्या शिवाय जय हिंद सेना स्वस्त बसणार नाही...याचे निवेदन मिरज प्रात यांना लोकशाही मार्गाने दोन दिवसात देण्यात येणार आहॆ.

कुपवाड शहरातील नागरिकांच्या तलाठी कार्यालयातील कामे विना मोबदला व्हावीत यासाठी माजी आमदार, लोकनेते आदरणीय कै. शरद पाटील सरांनी सुद्धा या विषयावर आवाज उठवला होता. त्याचे स्वप्न जय हिंद सेना साकार करेल.

चंदनदादा चव्हाण,पक्षप्रमुख, जय हिंद सेना, महाराष्ट्र राज्य.
Mo. 9421245003.

Share

Other News

ताज्या बातम्या