प्रतिनिधी : पुणे येथे सुरू असलेल्या १५ वर्षाखालील गर्ल्स इन्व्हिटेशन लीग स्पर्धेमध्ये चौथा सामना सांगली विरुद्ध रायगड यांच्यामध्ये झाला या सामान्यामध्ये सांगली संघाने विजय प्राप्त करून सुपर ८ मध्ये प्रथमच सांगली संघाने आपली जागा निश्चित केली आहे
सांगली संघाने प्रथम फलंदाजी करत ३५ ओव्हर मध्ये ३ बाद २१० धावा बनवल्या व विजयी साठी रायगड संघाला २११ धावांचे आव्हान दिले
धावांचा पाठलाग करताना रायगड संघाने ३५ षटकामध्ये ६ बाद १०७ धावा बनवण्यात आल्या व तब्बल १०३ धावांनी हा सामना सांगली संघाने एकतर्फी विजय प्राप्त केला
या सामन्यामध्ये कर्णधार कृष्णा सगरे हिच्या तडाखेबंद १०६ धावांची शतकी खेळीमुळे धावसंख्या मजबूत स्तिथीमध्ये पोहचवण्यात यश आले सोनल शिंदे हिने टूर्नामेंट मधील आपले वैयक्तिक दुसरे अर्धशतक झळकावले वैयक्तिक ६४ धावावरती ती बाद झाली.
गोलंदाजी मध्ये मधुश्री उपळाविकार व तेजस्विनी हिप्परकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले , वैष्णवी भंडारी हिने १ गडी बाद केला या सर्व खेळाडूंचे ,प्रशिक्षक व सिलेक्टर यांचे महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजयजी बजाज व राज्य टूरनामेंट कमिटी सदस्य निलेश शहा यांनी अभिनंदन केले.