आवाहन

सोमवार पासून रेल्वेच्या बेळगाव हुबळी मार्गावर पँसेजर ऐवजी आता डेमू धावणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/10/2025 7:11 PM

    दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून काही एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्या आयसीएफ डब्यांच्या ऐवजी डेमु चालवणार आहे.
        गाडी क्र. 1731/32  मिरज हुबळी मिरज एक्सप्रेस, गाडी क्र.51463/64 मिरज बेळगाव मिरज पॅसेंजर, गाडी क्र.51461/62 मिरज बेळगाव मिरज पॅसेंजर, गाडी क्र. 56931/32 मिरज लोंढा मिरज पॅसेंजर ,गाडी क्र. 17333/34 मिरज कँसरलाँक मिरज एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.
       या गाड्या 13,14,15 ऑक्टोबर पासून धावण्यास सुरुवात होणार आहे.
    आयसीएफ 11 डब्यांची गाडी धावत होती परंतु आता दोन इंजन कम रॅक व सहा डबे अशी आठ डब्यांची डेमु धावेल.
          दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने घेतलेला निर्णय हा प्रवाशांना सोईचे  असे ठरणारे नसून पूर्वीप्रमाणेच आयसीएफ डब्याने किंवा नवीन इलेक्ट्रिक मेमु या गाड्या सुरू करण्यात याव्यात यासाठी पाठपुरवठा करणार असल्याचे मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी सांगितले.

Share

Other News

ताज्या बातम्या