आवाहन

दत्त मारुती रस्त्याने घेतला मोकळा श्वास...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/10/2025 1:16 PM

दिवाळीच्या तोंडावर दत्त मारुती रोड मोकळा दिसत आहे..
सदर अतिक्रमण बाबत मत मतांतरे 100% आहेत रस्त्यावर बसून व्यापार करणाऱ्या व्यापारी बांधवांचे म्हणणं आहे सणावाराला आम्हाला इतरत्र नेऊ नये त्या ठिकाणीच धंदा करण्यात यावा 
सर्वसामान्य नागरिक व सदर रस्त्यावरील दुकानदार यांचे म्हणणे आहे की सदर रस्ता वाहतुकीसाठी अशा पद्धतीने मोकळाच राहिला पाहिजे 
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने दोन वर्षांपूर्वी असाच प्रयत्न करण्यात आला मात्र पावसामुळे तो फसला 
चालू वर्षी आयुक्त सत्यम गांधी यांच्या नेतृत्वाखाली टीमने चांगले काम केले आहे 
मात्र रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांच्या वर अडचणी आले आहेत मात्र यातून मार्ग काढून पर्यायी ठिकाणी व्यवसाय करून सीजन पार पाडला पाहिजे 
त्यासाठी समाज माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा त्यांना मदत केली पाहिजे 
काही तर चांगले होताना काहीतरी वाईट होत असते त्याचा कोणाला तरी त्रास होत असतो मात्र काही बाबतीत नाईलाज असतो तो सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे असे वाटते...
असो चांगल्याला चांगले म्हटले नाही तर कोणी सुद्धा काम करायचा प्रयत्न करणार नाही 
लगे रहो टीम महापालिका  

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली 

Share

Other News

ताज्या बातम्या