आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा दि.: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वाई तालुक्यात तब्बल दहा हजार वृक्षांची विक्रमी लागवड करून गावोगावी हरित वसंताचा उत्सव साजरा करण्यात आला. या मोहिमेत 32 गावांमध्ये ‘बिहार पॅटर्न’नुसार प्रत्येकी 200 झाडे तर इतर 67 गावांमध्ये प्रत्येकी 100 झाडे लावण्यात आली. स्मशानभूमी, मंदिर, शाळा, रस्त्यांच्या दुतर्फा तसेच घराघरांत लावलेले वृक्ष लागवड करण्यात आली.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शन आणि गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांचे नेतृत्वाखाली वृक्ष लागवड करण्यात आली. या उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी वृक्ष लावगड उपक्रमाचे कौतुक केले.
वृक्षारोपणाच्या या हरित उत्सवात प्रकल्प संचालक श्री विश्वास सिद यांनी वेळे गावात उपस्थिती नोंदवली. पंचायत समिती मधील ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी श्री राहुल हजारे, श्री रुपेश मोरे, श्री शरद गायकवाड, कृषी अधिकारी श्री शांताराम गोळे, विस्तार अधिकारी कृषी श्री नारायण पवार, यांनी गावे दत्तक घेऊन वृक्ष लागवड करण्यासाठी गाव पातळीवर प्रयत्न केले.