प्रति
1)मा. नाम. चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री सांगली जिल्हा
2) मा. जिल्हाधिकारी सांगली जिल्हा
3) मा. पोलीस अधीक्षक
सांगली जिल्हा
विषय: - सांगली जिल्ह्यातील तसेच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सीसीटीव्ही कॅमेरे बाबात
महोदय,
सांगली जिल्ह्यात तसेच सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षापासून सीसीटीव्ही कॅमेरे जिल्हा नियोजन समिती असेल महानगरपालिका आर्थिक मदतीने असेल बसवण्यात आले होते.
आम्ही घेतलेल्या माहितीनुसार सध्या बसलेले कॅमेरे दर पाच वर्षांनी परत नवीन बसवावे लागतात.
गेल्या दोन-तीन वर्षापासून जिल्ह्यातील व मनपा क्षेत्रातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद पडलेले आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्यातील व मनपा क्षेत्रातील रस्त्यावरील सुरक्षा ही रामभरोसे राहिलेली आहे सध्या AI टेक्नॉलॉजी चा बोलबाला चालू आहे सोशल मीडिया असेल व अन्य माध्यम असतील नवनवीन टेक्नॉलॉजी विकसित झालेले आहेत अशा टेक्नॉलॉजी मध्ये जर सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतील तर आपण कोणावर विश्वास ठेवायचा?
परवाच कॉलेज कॉर्नर येते अपघात झाला त्यानंतर अपघातातील फुटेज तपासण्यासाठी कॅमेरे तपासण्याची वेळ आली त्यात सदर कॅमेरे बंद आहेत अशी धक्कादायक बातमी उघडीस आली. आहे नुकत्याच मिरज सिविल हॉस्पिटल मध्ये लहान बाळाला चोरण्याची घटना उघडीस आली त्यावेळी सुद्धा मिरज हॉस्पिटल मधील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असलेले निदर्शनास झाले.
या सर्व बाबींचा विचार करून अत्याधुनिक पद्धतीचे व दीर्घकालीन तील असे सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ बसवण्यात यावे.
जिल्हा नियोजन समितीचे बजेट 500 कोटी आणि 600 कोटी रुपये चे असते असे वृत्तपत्रातून व वाहिन्यांतून ऐकतो मात्र त्या निधीचा उपयोग लोकांच्या सुरक्षेसाठी होत नसेल तर काय फक्त टक्केवारीसाठी सदर निधी वापरला जातो का असा खरा संशय बळावत आहे.
तसेच सार्वजनिक मंडळे असतील व्यापारी असतील उद्योजक असतील यांना माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आवाहन केले होते एक कॅमेरा पोलिसांसाठी त्याबाबत सुद्धा आमच्या नागरिक जागृती मंच असेल आमचे सुंदर गजराज युवक मंडळ असेल आम्ही शामराव नगर व खन भाग परिसर मध्ये 15 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत त्याचा फार मोठा उपयोग स्थानिक नागरिकांना होत आहे.
याबाबत पालकमंत्री असतील स्थानिक आमदार खासदार असतील यांनी आपापल्या स्थानिक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते वेगवेगळे सेल यांना आवाहन करून याबाबत परत एकदा जनजागृती करावी कारण तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील ग्रामपंचायत असतील त्यामुळे इच्छुक लोकांची संख्या भरपूर आहे त्यांचा वापर जरूर करावा असे आवाहन करत आहोत..
तसेच आतापर्यंत जे कॅमेरे बसवलेले आहेत त्याचा दर्जा व भविष्यात जे कॅमेरे बसवायचे आहेत त्याच्या दर्जाबाबत तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन दीर्घकालीन टिकतील आणि दर्जा चांगला असेल याबाबत सुद्धा दक्षता घ्यावी अशी विनंती आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.