सांगली जिल्हयातील एस टी बसेस च्या प्रदूषणाला जबाबदार कोण?, शिवसेना युवा नेते भगवानदास केंगार यांचा सवाल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/05/2025 6:05 PM

15-20 वर्षाचे जुनी बसेस सांगली मिरज रस्त्याने काळाकुट्ट धुर मारत फिरत आहेत यांना PUC कोण विचारणार..
सरकार  रोज एक नव्याने नियम काढत आहेत. खाजगी वाहनांची PUC नसेल तर पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळणार नाही असा शासन निर्णय  झालेला आहे.मग शासनाच्या गाड्यांना हा नियम लागू होत नाही का..?इथे नागरिकांचा आरोग्याच काय. सर्व अटी नियम हे फक्त खाजगी वाहनांनाच का ? व जनतेच्या मानगुटीवर बसून खाजगी वाहनांचे दंड वसुली करता मग शासनाच्या गाड्यांना कोण दंड करणार..? पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटी मध्ये सर्व सरकारी बसेस CNG व इलेक्ट्रिक वर आहेत मग सांगलीचे नशीब कधी उघडणार. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याला प्रदूषण मुक्त इलेक्ट्रिक व CNG बसेस देण्यात आलेले आहे सांगली विभागाला का अजून बसेस दिलेले नाहीत.महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व RTO विभाग काय झोपेत आहे का..? यांना हे सरकारी वाहनांचे प्रदूषण दिसत नाही का.? असा सवाल शिवसेना युवा नेते तथा सरपंच प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष भगवानदास केंगार यांनी केला आहे...

Share

Other News

ताज्या बातम्या