15 ऑगस्ट 2024 रोजी चिंतामण नगर रेल्वे पुलाच्या रखडलेल्या कामाच्या बाबतीत रेल्वे ट्रॅक वर स्वतंत्र दिन साजरा करण्याचे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
सदर आंदोलन करू नये म्हणून आज मिरज जंक्शन येथे पीएसआय संभाजी पोळ रेल्वेचे अधिकारी श्री शिंदे साहेब सांगली शहर पोलीस दलाचे अधिकारी संजय नगर पोलीस दलाचे अधिकारी यांच्याबरोबर मीटिंग संपन्न झाली
त्यांनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याचे दिनांक 29 जुलै 2024 रोजी मुंबई येथे रेल्वेचे अधिकारी श्री पाखरे साहेब यांच्याबरोबर झालेल्या मीटिंगचा वृत्तांत दिला
मात्र आम्ही त्यांना सांगितले श्री पाखरे साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांचे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत आमचा आता तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही.
तसेच सदर कामाची मुदत ऑगस्ट 2024 अखेर समाप्त होत आहे त्यानंतर त्या कामाला मुदतवाढ देणाऱ्या रेल्वेचे अधिकारी असतील अथवा सांगली जिल्हाधिकारी असतील यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल करून सर्वसामान्य नागरिक व्यापारी उद्योजक यांच्या झालेल्या नुकसान भरपाईची मागणी करणार आहोत.
यावेळी सतीश साखळकर कॉम्रेड उमेश देशमुख गजानन साळुंखे नितीन चव्हाण इत्यादी उपस्थित होते.
आम्ही ठरल्याप्रमाणे 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दहा वाजता स्वातंत्र उत्सव साजरा करणार आहोत.