प्रशासनाविरोधात घोषणेने कुपवाड दणाणले, दंडवत आंदोलनाचा घेतला प्रशासनाने धसका...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/07/2024 8:54 AM

कुपवाड मधील ट्रिमिक्स घसरगुंडी शक्तीपीठ महामार्गाच बंद असलेले काम व रस्त्याच्या मध्ये येणारे विद्युत पोल शिफ्टिंग करण्यासाठी वेळ मारून नेऊन कुपवाडकरांना गंडवणाऱ्या महानगरपालिकेच्या आयुक्त, अधिकारी, विद्युत अभियंता, शहर अभियंता यांना जाग येण्यासाठी आज सामाजिक कार्यकर्ते अभिषेक व्हनकडे जितेंद्र व्हनकडे यांच्या वतीने दंडवत आंदोलन करण्यात येणार होते. या आंदोलनाला संघर्ष समिती व व्यापारी संघटनेच्या वतीने पाठिंबा दिला होता..

परंतु दंडवत आंदोलन सुरू होण्यापूर्वी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्र.३ च्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात कनिष्ठ लिपिक यांनी भेट देऊन संबंधित अधिकारी विद्युत अभियंता, शहर अभियंता यांच्यासोबत फोनवरून संपर्क करून बोलणे करून दिले. दि.२६/०७/२०२४ शुक्रवार पासून काम चालू करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. शुक्रवार दि.२६/०७/२०२४ पासून काम चालू न झालेस पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या